रावेर, प्रतिनिधी । रावेर मतदार संघातील नगरपरिषदांच्या विकास कामांसाठी आ. शिरीष चौधरी यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने रावेर व फैजपुर नगरपरिषदांच्या विकासकामांसाठी ४ कोटी ९२ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.
रावेर शहरातील प्रभाग क्र.१ हनुमान व्यायम शाळेपासून ते प्रकश जोशी यांच्या घरापर्यत रस्ता डांबरीकरण करणे. २० लाख प्रभाग क्र.३ मध्ये श्रीराम अग्रवाल यांचे दुकानापासून ते घासबाजारापर्यत रस्ता डांबरीकरण करणे. १५ लाख प्रभाग क्र.६ मस्तनशहा दर्गापासून ते संभाजीनगर पुलापर्यत रस्ता डांबरीकरण करणे. १५ लाख. प्रभाग क्र.७ निजाम बेकरीपासून ते मस्तनशहा दर्गापर्यत ब्लॉक बसविणे. २० लाख प्रभाग क्र.८ श्री शनी मंदिरापासून ते रेल्वे स्टेशन गेट पर्यत रस्ता डांबरीकरण करणे. रु.५० लाख श्रीराम महाजन यांचे घरापासून ते छोरीया मार्केटचे गेटपर्यत रस्ता काँक्रीटीकरण करणे. रु.३० लाख. इदगाहपासून ते कौसर मस्जीदपर्यत रस्ता डांबरीकरण करणे. ३० लाख मन्यार कब्रस्थान पासून ते ब-हाणपूर पुलापर्यत रस्ता काँक्रीटीकरण व गटार तयार करणे.४० लाख. प्रभाग क्र.८ डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मधील रतीराम घेटे यांच्या घरापासून कै.अंबादास गजरे यांच्या घरापर्यत गटारीसह रस्ता काँक्रीटीकरण करणे. १५ लाख ऊर्दू स्कूल नं.१ सौकत मैदान मध्ये काँक्रीटीकरण करणे. ८ लाख रावेर रोड ते राजीव नगर व अग्रसेन भवन पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. १० लाख असा रु.२ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.
फैजपूर शहरातील २ कोटी ३९ लाख मंजूर
फैजपुर शहरासाठी २ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. असा सर्व मिळून एकूण ४ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी या नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी ‘विशेष अनुदान’ योजनेंतर्गत मंजूर झालेला आहे. लवकरच या कामांना सुरुवात होईल अशी माहिती खिरोदा आमदार कार्यालयाकडून मिळालेली आहे.