रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील केळी पिकावर सी.एम.व्ही. (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून विटवा येथील शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन मा आ.चंद्रकांत पाटील यांनी पाहणी कलेची. त्यांच्या सोबत तहसीलदार व कृषी अधिकारी हे देखील उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की, केळी या पिकावर सध्या सी.एम.व्ही. नावाच्या व्हायरसचा विळखा पडलेला आहे. हा व्हायरस अतिशय वेगाने वाढत असल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त बनला आहे. प्रादुर्भाव झालेले केळी हे पिक शेतकरी अक्षरशः उपटून बांधांवर फेकत असल्याने चिंताग्रस्त शेतकर्यांच्या शिवारात आज दि.25 रोजी आ.चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार व तालुका कृषी तालुका अधिकारी एम जी भामरे, यांच्या समवेत प्रादुर्भाव झालेल्या रावेर तालुक्यातील विटवा या परिसरात थेट बांधावर जावुन नुकसान ग्रस्त शेती शिवाराची पाहणी केली.
यावेळी तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्याच्या सूचना आ.चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार व कृषी अधिकारी यांना केल्या.यावेळी उपस्थित सर्व शेतकरी बांधव उदय रघुनाथ पाटील, भगवान हरी पाटील, अनिल दत्तात्रय पाटील, सुनील बाबुराव पाटील, मोहन शिवराम पाटील, राजेश सागरचंद चौधरी, विजय देवराम चौधरी, मुरलीधर नाना पाटील, चेतन चौधरी, मुकेश पाटील, बाबु नाना पाटील लक्ष्मन मनुरे, रेंम्भोटा येथील छोटू पाटील,गोपाळ भाऊ सोनवणे मुक्ताईनगर, युवासेना शहर प्रमुख राकेश घोरपडे, तुषार कचरे उपस्थित होते..