जळगाव, प्रतिनिधी । स्थायी समिती सभापती शुचिता हाडा यांनी केल्या प्रयत्नानंतर आज शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी जळगाव मनपात माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ग्रास कटर मशिनचे लोकार्पण करण्यात आले.
शहरातील प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र ग्रास कटर मशीन असे एकूण २० मशीन देण्यात आले. आज प्रातिनिधिक स्वरूपात २ ग्रास कटर मशीनचे लोकार्पण माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते महापालिका सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, सभापती ऍड. शुचिता हाडा, महिला बालकल्याण सभापती शोभा बारी, आयुक्त सतीश कुलकर्णी, भाजपा सभागृह नेते ललित कोल्हे, गटनेते भगत बलाणी, आदींची यावेळी उपस्थतीती होती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2761394217427311/