पाचोरा – नंदू शेलकर | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. १९ आॅक्टोबर २०१९ रोजी याच श्रीराम मंदिरात सुमारे तासभर पुजा केली होती. याच मंदिरात आज आ. किशोर पाटील यांच्या समर्थकांनी महाआरती करत त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागून त्यांना मंत्रिपद मिळावे असे श्रीरामास साकडे घातले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार किशोर पाटील यांची अतिशय जवळीक असल्याने ना. एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन वर्षांत पाचोरा मतदार संघात ८० कोटी रुपयांची विकास कामे दिली. याशिवाय गेल्या दोन वर्षांत एकनाथ शिंदे हे तब्बल पाच वेळा आ. किशोर पाटील यांच्या निवासस्थानी येवुन गेल्याने आ. किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळेल ? अशी अपेक्षा मतदार संघातील नागरिकांकडुन व्यक्त केली जात आहे. येथील श्रीराम मंदिरात सकाळी ११ वाजता महाआरती करण्यात आली. आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, मा. नगराध्यक्ष संजय गोहील, मा. उपनगराध्यक्ष शरद पाटे, मा. उपनगराध्यक्ष गणेश पाटील, न. पा. गटनेत्या सुनिता किशोर पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, ज्ञानेश्वर चौधरी, नगरसेवक शितल सोमवंशी, राम केसवानी, बापु हटकर, गंगाराम पाटील, बाजार समितीचे मा. संचालक अनिल पाटील, शिवदास पाटील, पंढरीनाथ पाटील, रमेश पाटील, पप्पु राजपुत, भुषण पेंढारकर, राहुल पाटील, सागर पाटील, संदिपराजे पाटील, गजु पाटील, तुषार जगताप, पिंटु शिंदे, राज अमृतकर, समाधान पाटील, एकनाथ पाटील, मालती बापु हटकर, स्मिता बारावकर, सुनंदा महाजन, चंदा ठाकरे, सुरेखा वाघ, विमलबाई निवार्ते, आशा जैन, आशा हटकर, प्रिती सोनवणे, गिता सुरळकर, ज्योती सोनवणे, सौरभ चेडे, सुमित सावंत सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/786545955689477