जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज । सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग आस्थापना, व्यापार, व्यावसायिक, कारखाने यांनी त्यांच्याकडील माहे 1 जानेवारी ते 31 मार्च, 2023 या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-१) दि 30 एप्रिल, 2023 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, १९५९ व नियमावली, १९६० अन्वये त्रैमासिक विवरणपत्र सादर/अद्ययावत करणे बंधनकारक आहे.
या अनुषंगाने माहे १ जानेवारी, २०२३ ते ३१ मार्च, २०२३ या कालावधीत आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील नियोक्ता या ऑप्शनवर क्लिक करुन आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने ३० एप्रिल, २०२३ पर्यंत भरावयाची आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. यात कसूर झाल्यास आणि आस्थापना दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. असे श्री. वि.जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.