जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | लवकरच आसोदा रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामा दरम्यान, आसोदा रेल्वे फाटक बंद ठेवण्यात येणार असल्याने पर्यायी मार्गाची मनपा आयुक्त व महारेलच्या अधिकाऱ्यांनी आज पाहणी केली.
आसोदा रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या कामाकरिता आसोदा रेल्वे फाटक बंद ठेवण्यात येणार आहे. हे फाटक बंद झाल्यावर नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी महारेलचे संजय बिराजदार , शहर अभियंता एम. जी. गिरगावकर यांच्या सह पर्यायी वळण रस्त्याची गुरुवार दि. २३ जून रोजी पाहणी केली. यात त्यांनी उत्तरेकडील रेल्वे फाटकला समांतर असलेल्या १८ मीटर रस्ता यासोबतच यापुढील १५ मीटरच्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. या दोन्ही रस्त्यांपैकी कोणता रस्ता नागरिकांना सोयीस्कर ठरेल याचा अभ्यास करून एक रस्ता पर्यायी वळण रस्ता म्हून निवडला जाणार आहे. या पाहणी दौरा करते समयी सहाय्यक नगररचनाकार शकील शेख, अभियंता प्रसाद पुराणिक व शाखा अभियंता रेंद्र जावळे हे उपस्थित होते.