पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील गुरांचा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. अशी माहिती पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा जि. जळगाव. कार्यक्षेत्रातील उपबाजार वरखेडी येथील गुरेढोरे, शेळी, मेंढी खरेदी विक्री करणाऱ्या सर्व शेतकरी व व्यापारी व संबंधित घटकांना सूचित करण्यात येते की, २९ जुन २०२३ वार गुरुवार रोजी आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त वरखेडी उपबाजार येथे गुरुवारी भरणारा गुरांचा बाजार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बाजार समितीचे सभापती यांच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात येत असून कोणीही आपली जनावरे विक्रीस आणू नये. तसेच यापुढील गुरुवारी भरणारा गुरांचा बाजार नियमितपणे भरविण्यात येईल
याची सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे. असे आवाहन पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील व सचिव बी. बी. बोरुडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.