आषाढी एकादशीनिमित्ताने आयोजित ऑनलाईन अभंग गायन स्पर्धेत रमाबाई बडगुजर प्रथम

यावल,  प्रतिनिधी  । यावल तालुक्यातील डोणगाव येथील राॅयल फौजी योगेशभाऊ पाटील मित्रपरिवारातर्फे आषाढी एकादशी निमित्ताने आयोजित ऑनलाईन अभंग गायन स्पर्धेत रमाबाई बडगुजर (रा.कोलते वाडा यावल) यांनी प्रथम क्रमांक पटकविला आहे. 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका युवक सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य शांताराम अरुण पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यावल तालूका युवक संघटक भरत गुलाबराव पाटील यांनी  दि.६ जुलै  ते १८ जुलै दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आँनलाईन अभंग गायन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात १,१११ रूपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस रमाबाई रमा बडगुजर (रा.कोलते वाडा यावल) यांना जाहीर झाले  आहे. तर दुसरे ७५१ रूपयांचे बक्षीस मनोहर भीमराव ढिवरे रा.चहार्डी ता.चोपडा यांनी तर तिसरे ५५१ रूपयांचे बक्षीस डिंम्पल विजय बडगुजर रा.अमळनेर यांनी पटकावले आहे. या स्पर्धेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धकांना आपल्या घरातुनच अंभगाचा व्हिडीओ तयार करुन पाठवायचा होता. या स्पर्धेत जिह्यातील अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवुन स्पर्धा यशस्वी केली.  या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांसह सर्व सहभागी स्पर्धकांचे राॅयल फुजी योगेशभाऊ पाटील मित्रपरीवार डोणगांवच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

 

Protected Content