यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आश्रय फाउंडेशनच्या वतीने तिथीनुसार दोन जून रोजी हिंदवी स्वराज्य संस्थेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीनशे व्या शिवराज्याभिषेक दिना निमित्ताने रावेर -यावल तालुक्यात मोठया प्रमाणावर ‘घर घर भगवा’ हे अभियान राबविण्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
रावेर-यावल आश्रय फाउंडेशनच्या वतीने रावेर यावल विधानसभा क्षेत्रातील तालुक्यातील गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा येथील यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी मंगळवारी येथे भाजपाच्या तालुका संपर्क संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
रावेर – यावल तालुक्यातील तरुण पिढीसह सामान्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा उज्वल इतिहास अवगत व्हावा आणि युवा पिढीने छत्रपतींचा आदर्श घ्यावा यासाठी तिथीनुसार येत असलेल्या २ जून रोजी ३५० व्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत युवकांना प्रेरणा मिळावी या हेतुने राजेंच्या विविध पैलुंच्या परिचय पत्रिकेच्या रूपात तसेच भगवा ध्वज याचे फाउंडेशन च्या वतीने २० हजार भगव्या ध्वजासह , स्टिकर्स. तसेच कार्यपत्रीकेचे नागरीकांना वाटप करणार आहे.
या संदर्भात फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. याप्रसंगी फेगडे यांनी बोलताना सांगितले की, शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके१५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला या वर्षी या ऐतीहासीक घटनेला साडेतीनशे वर्षे होत आहेत छत्रपतींचा युवा पिढीला उज्वल इतिहास अवगत व्हावा हा फाउंडेशन चा उद्देश असल्याचे सांगून या दिवशी महिलांनी घरोघरी दारात रांगोळ्या काढून रात्री दीपोत्सव साजरा करावा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन युवा सामाजीक कार्यकर्त व आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ .कुंदन फेगडे यांनी केले आहे.