आशाबाबा नगर येथे महिलेवर चाकूने वार : चौघांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तरुणासोबत लिव्ह इन रिलेशीपमध्ये राहत असलेली ३० वर्षीय महिला तरुणाला सोडून तिच्या आईकडे निघून गेल्याच्या रागातून तरुणाने महिलेवर चाकूने वार केल्याची गंभीर घटना जळगाव शहरातील आशाबाबा नगर येथे घडली. या घटनेत महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी गुरुवार, १९ मे रोजी गुन्हा दाखल होवून रामानंदनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गेंदालाल मील भागातील ३० वर्षीय महिला रामानंदनगर परिसरातील बंटी उर्फ प्रदुम्न नंदू महाले यांच्यासोबत लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहते. महिला बंटी यास सोडून तिच्या आईकडे राहायला गेल्याच्या रागातून बंटी याने १८ मे रोजी आशाबाबनगर येथे महिलेच्या हातावर व डोक्यावर चाकूने वार केले. तसेच चाकूने दहशत निर्माण केली. तर बंटी सोबतच्या इतर तिघांनी तक्रार करु नये म्हणून महिलेला रिक्षातून पळवून नेले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन गुरुवार, १९ मे रोजी बंटी ऊर्फ प्रदुन्म नंदू महाले( रा. रामानंदनगर), अरबाज अमजद खान पठाण (रा.आझाद नगर), गुलशन रजा (रा.चिश्तीया मशीदजवळ ), समाधान हरचंद भाई (रा. खंडेराव नगर) व सोनू ऊर्फ समीर शेख लुकमान शेख (रा.पिंप्राळा हुडको) या चार जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक शांताराम पाटील हे करीत आहेत.

Protected Content