जळगाव : प्रतिनिधी । आशादीप महिला शासकीय वस्तीगृहामध्ये दाखल महिलांमध्ये सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या काळजीवाहक सुनंदा वाघोटे व महिला पोलीस प्रतिभा खैरे या दोघींना भांडण करणाऱ्या पाच महिलांनी मारहाण केल्याची घटना घडली.
मंगळवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा या महिलांच्या विरोधात दाखल करण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास रत्नमाला सोनार, बंटी कुमारी, नुरीबी सत्तार, आशा अनपट व आहेर अशा पाच महिलांमध्ये भांडण सुरू होते. यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या वरिष्ठ काळजीवाहक सुनंदा वाघोटे व महिला पोलीस प्रतिभा खैरे या भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता, या महिलांनी सुनंदा यांना बुक्क्यांनी मारहाण केली तर प्रतिभा खैरे यांच्या उजव्या हाताला मार लागलेला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहेत .