जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधीत मद्य विक्री करतांना आढळून आलेल्या आर. के. वाईन या दुकानाचा परवाना जिल्हाधिकार्यांनी रद्द केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, सध्या लॉकडाऊन सुरू असून मद्याची दुकाने देखील पूर्णपणे बंद आहेत. तथापि, काही व्यावसायिक अन्य दुकाने बंद असल्याचा लाभ उचलून चोरट्या मार्गाने विक्री करत असल्याचे दिसून आले होते. या अनुषंगाने १२ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अजिंठा चौफुली येथे असणार्या आर. के. वाईन्स या दुकानावर छापा मारला. यात उपलब्ध असणार्या साठ्यापेक्षा खूप कमी साठा आढळून आला. यामुळे संबंधीत दुकानदाराने लॉकडाऊनच्या कालावधीत संबंधीत दुकानदाराने मद्यविक्री केल्याचे निष्पन्न झाले होते. या अनुषंगाने दुकानदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर आज जिल्हाधिकार्यांनी राजकुमार शीतलदास नोतवानी, सुधा राजकुमार नोतवानी व सौ दिशान दिनेश नोतवानी यांच्या नावाने असणारा आर. के. वाईन्सचा परवाना रद्द करत असल्याचे आदेश आज काढले असून यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००