जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुळजी जेठा महाविद्यालयातील सोहम डिपार्टमेंटर ऑफ योगा ॲण्ड नॅचरोपॅथी विभागच्या वतीने अंतर्गत एम.ए. योगिक सायन्स पदविका अभ्यासक्रमाच्या अंतर्गत येणाऱ्या निःशुल्क योग शिबिराचा आर. आर. विद्यालयात समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाला, मंचावर सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागाच्या योगशिक्षिका प्रा. ज्योती वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोप कार्यक्रमात प्रा. ज्योती वाघ यांनी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना योगा विषयी मार्गदर्शन केले. योग शिक्षिका हर्षा वर्मा आणि हिना शाह यांनी २८ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान दरम्यान शहरातील आर.आर. विद्यालयात नि:शुल्क योग शिबीरात विद्यार्थ्यांकडून योगाचे प्रात्यक्षिके करून घेतले. या शिबिराला विभागप्रमुख प्रा. डॉ. देवानंद सोनार, प्रा. गीतांजली भंगाळे, प्रा. पंकज खासबागे, प्रा. अनंत महाजन, प्रा. डॉ. सोनल महाजन, प्रा. ज्योती वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगशिक्षिका हर्षा वर्मा यांनी केले तर प्रास्तविक व आभार योगशिक्षिका हिना शाह यांनी मानले.