जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मोनाली कामळस्कर फाऊंडेशनने काथार वाणी समाजात आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी औषधींच्या ३०० बॉटल वितरित करून पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपली आले. अंबरनाथ येथील मेडिक्वेस्ट पॅथॉलॉजीचे संचालक विनोद वाणी यांनी व रेडक्रॉस सोसायटी जळगांवच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
लॉकडाऊन काळात समाजबांधवांसह परप्रांतीय नागरिकांसाठी मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या मोनाली कामळस्कर फाऊंडेशनने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काथार वाणी समाजातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून ३०० बॉटल्सचे मोफत वितरण करण्यात आले. समाजातील तेजस कामळस्कर यांनी अंबरनाथ येथून औषधी आणून प्रमोद वाणी यांच्याकडे सुपूर्द केल्या होत्या. मोनाली कामळस्कर फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधाकर वाणी यांच्या उपस्थितीत औषधींचे परीसरनुसार नंदकिशोर कामळस्कर, विजय वाणी, राहुल हरणे, ललित वाणी यांनी वर्गीकरण केले. फाऊंडेशनचे संस्थापक नंदकिशोर कामळस्कर यांनी विनोद वाणी व रेडक्रॉस सोसायटी जळगांवचे डॉ.रेदासनी यांचे आभार मानले.
आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांच्या बॉटल संपूर्ण जळगांव शहरात मोफत वाटप करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी अजय कामळस्कर, राजेश वाणी, अनंत काश्यप, वासुदेव वाणी, रवींद्र वाणी, अनिल वाणी, प्रमोद वाणी, नितिन चंदनकर, शंकर वाणी, शरद वाणी, राहुल हरणे, विजय वाणी, किशोर कामळस्कर, सुधाकर वाणी, धुळे येथे हर्षल कामळस्कर यांनी परिश्रम घेतले.