रावेर (प्रतिनिधी) – तपासात सहकार्य करा आरोपीची माहिती असल्यास आम्हाला गोपनीय कळवा निष्पाक व्यक्तीवर आमच्या कडून केव्हाच कोणावर अन्याय होणार नाही थोडा धीर धरा उटखेडाच्या गुन्हा गुतां-गूंतीचा झालाने आम्ही योग्य व खात्री करूनच खऱ्या आरोपीच्या शोधात पोलिस प्रशासन असल्याचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी उटखेड़ा येथील महिलांना सांगितले
याबाबत वृत्त असे की, उटखेड़ा येथील महिले प्रकरण अश्लील संभाषण व विनयभंगामुळे संपूर्ण तालुक्यात चर्चेला आलेला गुन्हा असून खऱ्या आरोपी पर्यंत पोहचण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे यासाठी पोलिसां कडून तपासासाठी उटखेड़ा गावातील काही युवकांना चौकशीसाठी बोलविले जात आहे… याचच राग घेऊन त्या युवकांच्या आई,बहिन,व इतर महिला नातलक रावेर पोलिस स्टेशन येऊन आमच्या मुलांना नाहक त्रास देऊ नका आआमचे मुले शिक्षण घेत असून त्यांना येथे चौकशीसाठी आणू नका असे अवाहन पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या कडे करत होत्या परंतु या सर्व महिलांना रामदास वाकोडे यांनी समजूत घालत तपासासाठी आम्ही त्यांना आणत असून आमचे समाधान झाल्यावर सोडून सुध्दा देत आहोत जो पर्यंत उटखेड़ा गावातून सहकार्य होत नाही तो पर्यंत आरोपी आम्हाला कसा मिळेल यासाठी कृपया आपण निश्चिंत असावे जरी तुमचे मुले शिक्षण घेत आहे हे आम्हाला सुध्दा माहिती आहे. कृपया पोलिसांची बाजू आपण सर्वांनी समजून घेऊन सहकार्य करण्याचे अवाहन पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी उटखेड़ा येथील महिलांना केले यावेळी महिला देखिल समजूतीची भूमिका घेऊन पोलिसां सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन यावेळी निघुन गेल्या आहे
==============================
*तपास कामासाठी सायबर तज्ञ रावेरात*
उटखेडा गावाच्या गुन्हाच्या तपासासाठी सायबर सेल शाखा,स्थानिक गुन्हे शाखाचे श्री वारुळे आपल्या पथकासह रावेर व उटखेड़ा येथे येऊन गेले आहे
त्यांनी विविध टावरांचे लोकेशन व सायबर संदर्भात माहिती गोळा करीत आहे दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे,पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस टीम तपास करीत आहे