जळगाव, प्रतिनिधी । रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया आंबेडकर गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाशिक ओझर विमानतळाला पद्मश्री कर्मविर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे व इतर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (ए) च्या जिल्हा शाखेच्या वतीने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे, जिल्हाध्यक्ष दिपक सपकाळे, दिपक बरडे, चेतन मंडलीक, यशवंत बैसाणे, जिल्हा महासचिव यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलन स्थळास आमदार राजू मामा भोळे यांनी भेट देवून आंदोलकांना पाठींबा दर्शवत चर्चा केली. यावेळी त्यांनी आंदोलकांना त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वसन दिले. आंदोलकांच्या प्रमख मागण्या : नाशिक ओझर विमानतळाला पद्मश्री कर्मविर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे. जळगाव शहर व तालुक्यातील बीपीएल व प्राधान्य शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद पडले आहे त्या शिधापत्रिकांचे धान्य सुरू करण्यात यावे. जळगाव शहर संजय गांधी योजनेअंतर्गत तहसिल कार्यालयातील मनमानी कारभार थांबविण्यात यावा. शासनामार्फत आधार सिडींगसाठी डाटा एन्ट्री करीता अमळनेर येथील कार्यालय हे तहसिल कार्यालयात असावे. जळगाव तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागातील SAK पद अनेक दिवसांपासून आहे ते पद कायमस्वरूपी करण्यात यावे. तरी आपण आमच्या मागण्या संदर्भात आपण गांर्भीर्याने विचार करून अधिपत्याखालील मागण्या आपण तात्काळ मार्गी लावाव्यात व वरीष्ठ स्तरातील लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दीपक सपकाळे, रत्नाकर जोहरे, जळगाव तालुका अध्यक्ष अशोक पारधे, ओबीसी आघाडी अध्यक्ष हर्षल पाटील, महानगराध्यक्ष राजू सपकाळे आदी उपस्थित होते.
भाग १
https://www.facebook.com/508992935887325/videos/511340819926567
भाग २
https://www.facebook.com/508992935887325/videos/260259482278815