जळगाव, प्रतिनिधी । उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकास अवैधरित्या प्रवासी वाहतुक करतांना आढळून आलेल्या ऑटोरिक्षांविरुध्द विशेष मोहिमेत जप्त केलेल्या 10 ऑटोरिक्षांची नोंदणी या कार्यालयाच्या अभिलेख्यांवर असल्याचे दिसून येत नाही. त्या भंगार/स्क्रॅप 10 रिक्षांचा लिलाव उप प्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे 4 जुलै, 2020 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर स्क्रॅप स्थितीतील 10 ऑटोरिक्षा लिलावातून खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी जास्तीत-जास्त रक्कमेचा धनाकर्ष (DD) उप प्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे दिनांक 3 जुलै, 2020 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत अर्जासह जमा करावा. दिनांक 4 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सर्व अर्जदारांच्या समक्ष लिफाफे उघडण्यात येतील. व सर्वाधिक धनाकर्ष (DD) सादर करणाऱ्यास सदरच्या 10 ऑटोरिक्षा विकण्यात येवून त्या ऑटोरिक्षांचे तुकडे करूनच त्यांच्या ताब्यात देण्यात येतील. त्या रिक्षा रस्त्यावर चालविणार नाही अथवा त्या कोणालाही वापरण्यास देणार नाही असे शपथपत्र संबंधितांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक असेल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.