भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रिक्षाचालकांना आरटीओ विभागामार्फत मनमानी व हूकुमशाही पद्धतीने मेमो दिले जात आहे. मात्र हा मनमानी कारभार थांबविण्यासाठी राष्ट्रीय रिक्षा संघटनेचे महामंत्री जगन सोनवणे यांनी 150 रिक्षासह मोर्चा काढला आहे.
याबाबत माहिती अशी की, सर्व रिक्षा चालकांना आरटीओ विभागामार्फत मेमो दिले जात आहेत. हे मेमो हुकूमशाही पद्धतीने देऊन दंडाच्या रक्कमेचा धाक देऊन एजंटच्या माध्यमातून व आरटीओ विभागातील कर्मचारी यांच्या माध्यमातून दंडाच्या नावाखाली तोडी पाणी तसेच पैशाची मागणी करुन रिक्षा चालकांना त्रास देण्यात येत आहे. किंबहूना, रिक्षात बसलेले रुग्णांना रस्त्यावर उतरुन रिक्षाचालकांवर कारवाई केली जाते. यावर आळा बसावा म्हणून राष्ट्रीय रिक्षा चालक मालक संघटनेचे महामंत्री जगन सोनवणे यांनी 150 रिक्षासह मोर्चा काढला आहे. मोर्चा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड पासून गांधी पुतळा, लोखंडी पुल, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ताजोद्दीन बाबा दर्गा रेल्वे स्टेशन समोर समारोप झाला. यावेळी घोषणांनी शहर दणाणले होते. यानंतर 1 जुलै रोजी जळगांव येथिल आरटीओ कार्यालयावर 20 हजार रिक्षासह मोर्चा काढण्यात येणार असून, मोर्चाचे रुपांतर आमरण उपोषणात करणार असल्याचे जगन सोनवणे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय रिक्षा चालक्र मालक सेना प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, जिल्हा अध्यक्ष संजीव इंगळे, जिवन कोळी, आशीश बढे, साजीद शेख, धनराज लोणारी, राजेश सुर्यवंशी, सुनिल ठाकूर, गणेश भोई, शुभम वैदय, संगीता ब्राम्हणे, मनिष कुळकर्णी, नरेश सोनवणे उपस्थित होते.