नवी दिल्ली वृत्तसंस्था । सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकावर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली.
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांमधील सवर्णांना १० टक्के आरक्षणाची तरतूद असणारे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत पारित झाले होते. यानंतर या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी स्वाक्षरी केली आहे. यामुळे या विधेयकाचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर देशातील किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळांची संमती मिळाल्यानंतर हे आरक्षण लागू होईल. मात्र याआधीच्या या विधेयकाच्या विरूध्द न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.