पहूर, प्रतिनिधी । सोयाबीन न उगविल्याप्रकरणी बियाणे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कृषी आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध दि १० ते १२ जुलै दरम्यान पहूर येथील कृषी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविण्यात येणार आहे.
कृषी आयुक्तांनी सोयाबीन न उगविल्याप्रकरणी बियाणे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल आदेश दिले आहेत. याविरोधात महाराष्ट्र फर्टिलायझर ,पेस्टीसाईड ,सीडस डीलर्स अशोसिएशनच्या निर्णया नुसार पहूर येथील सर्व कृषी केंद्र बंद असणार असल्याचे पहूर कृषी केंद्र संघटनेच्या वतीने माजी सभापती प्रदिप लोढा यांनी सांगितले आहे.