मुंबई, वृत्तसेवा | आयसीसीने कसोटी संघाची वर्ष २०२१ च्या सर्वोत्कृष्ट कसोटी संघाची घोषणा केली आहे.या संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला असतांना विराट कोहलीची मात्र निवड करण्यात आलेली नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वर्ष २०२१ च्या सर्वोत्कृष्ट कसोटी संघात भारताचा रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि आर. आश्विन या तिघांचा समावेश आहे. या संघात विराट कोहलीला स्थान मिळविता आलेले नाही. मागील दोन वर्षांपासून विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आयसीसीच्या संघात विराट कोहलीला स्थान मिळाले नाही. आयसीसीने कसोटी संघाची धुरा न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या खांद्यावर सोपवली आहे. आयसीसीने निवडलेल्या संघामध्ये सर्वाधिक तीन तीन खेळाडू भारत आणि पाकिस्तान संघातील आहेत. आयसीसीने एकदिवसीय आणि टी२० संघामध्ये एकाही भारतीय संघाला स्थान दिले नाही. 2021 मध्ये भारतीय संघाने खूप कमी एकदिवसीय सामने खेळे होते. तर टी२० विश्वचषकात खराब कामगिरी झाली होती. त्यामुळेच आयसीसीने एकदिवसीय आणि टी२० संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान दिले नाही. पण कसोटी संघात तीन खेळाडूंना स्थान दिलेय. रोहित, अश्विन आणि पंत यांना कसोटी संघात स्थान देण्यात आलेय.