Home क्रीडा आयसीसीच्या क्रमवारीत भारतीयांचा बोलबाला

आयसीसीच्या क्रमवारीत भारतीयांचा बोलबाला

0
31

मुंबई प्रतिनिधी । आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा बोलबाला असल्याचे दिसून आले आहे.

आयसीसीने आज कसोटी फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. यात विराट कोहलीने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. दुसर्‍या क्रमांकावर न्यूझिलंडचा फलंदाज केन विल्यमसन आहे. तर तिसर्‍या क्रमांकावर भारताच्या चेतेश्‍वर पुजाराने झेप घेतली आहे. यासोबत नवोदित फलंदाज ऋषभ पंत यानेही कसोटी क्रमवारीत १७ वे स्थान मिळवले आहे. पुजारा आणि पंत यांनी नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अतिशय दमदार फलंदाजी केल्यामुळे त्यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound