जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील आयएमएच्या वूमन्स विंगतर्फे महिला डॉक्टरांसाठी आर्थिक नियोजन व गुंतवणूक या विषयावर सी.ए.अनुया कक्कड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
आयएमए सभागृहात झालेल्या व्याख्यानाप्रसंगी वूमन्स विंगच्या अध्यक्ष डॉ. किर्ती देशमुख, सचिव डॉ. मनजित संघवी यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानात कक्कड यांनी महिला डॉक्टरांना आर्थिक व्यवहाराविषयी जागरुक करीत स्वतःचे जमा-खर्च तपासणे, नॉमिनी लावले आहे काय ? याची दक्षता घेणे, गुंतवणूक करतांना घरातील पुरुष मंडळी सोबत सहभागी होणे अशा टिप्स देत मार्गदर्शन केले. पॉवर पॉईटद्वारे सादरीकरण करुन त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणे दिलीत.
सूत्रसंचालन डॉ. पूनम दुसाने यांनी तर परिचय डॉ. योगिता हिवरकर यांनी करुन दिला. आभार डॉ. हर्षिता नाहाटा यांनी मानले. कार्यक्रमास आयएमएचे अध्यक्ष डॉ. दीपक आठवले व सचिव डॉ. जितेंद्र कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी डॉ. रितू कोगटा, डॉ. शितल अग्रवाल यांच्यासह वूमन्स विंगच्या सर्व सदस्यांनी कामकाज पहिले. व्याख्यानास ६५ महिला डॉक्टरांची उपस्थिती होती.