आयएमआरच्या माजी विद्यार्थ्यांचा पुणे आयोजित मेळाव्यास भरभरून प्रतिसाद

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई संस्थेच्या इस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्चचा पुणे येथे आयोजित करण्यात आलेला माजी विद्यार्थ्यांच्या वार्षिक सोहळ्यास भरभरून प्रतिसाद मिळाला. हा सोहळा संस्थेचे चेअरमन प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे ह्यांच्या दूरदृष्टीतून पुण्यात साकारला गेला.

हॉटेल श्रेयस येथे आयोजित ह्या दिमाखदार सोहळ्यासाठी जळगाव, मुंबई, पुणे, भोपाळ, दिल्ली आणि नागपूर येथून विद्यार्थी आले होते. आयएमआरच्या स्थापनेपासून (१९८६) ते २०२० चे एमबीए आणि एमसीएचे एकूण १८५ माजी विद्यार्थी सामील होते. ह्यावेळी विद्यार्थ्यांनी कॉलेज दिवसातील आठवणींना उजाळा देत, त्यांच्या कार्याची माहिती दिली आणि सध्या शिकणाऱ्या तसेच भावी विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या व इंटर्नशीप संधी, नोकरीविषयक मार्गदर्शन आणि इंडस्ट्री संपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि इस्टिट्यूटसाठी सदैव तत्पर राहण्याचे देखील आश्वासन दिले.

उपस्थित माजी विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिजनेस मैनेजमेंटच्या संचालिका डॉ. मधुलिका सोनवणे ह्यांनी त्यांच्या यशात आयएमआरचे किती योगदान आहे, ह्याचा परिचय उपस्थितांना करून दिला, अमृता देवगावकर ह्या महाराष्ट्र बीजेपी व्यापारी सेलच्या अध्यक्षा ह्यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील तसेच राजकारणातील संधींना शोधण्याचे व उद्योग स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले. डॉ. तृप्ती अग्रवाल ह्या वीआयटी समूहाच्या एमडी ह्यांनी स्टार्ट-अप सुरु करण्याचे मार्गदर्शन केले तसेच इस्टिट्यूटला आणि विद्यार्थ्यांना भविष्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले, मिथिलेश ओझा आणि परज सिंग राजपूत ह्यांनी आयटी क्षेत्रातील संधींची माहिती उपलब्ध करून दिली. डॉ. आनंद दुबे ह्यांनी चांगल्या बिजनेस आयडियासाठी दहा लाखापर्यंत मदत करण्याचे आश्वासन दिले, राष्ट्रीय एचआरडी नेटवर्कचे नलीन श्रीवास्तव ह्यांनी करिअर घडविताना जीवनाचा आनंद देखील घेण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला, जयश्री भांगले ह्यांनी देखील करिअर घडविण्यासाठी आवश्यक बाबींचा उल्लेख केला. एअरटेल मध्ये कंट्री हेड पदावर काम करणाऱ्या सौरभ चौधरी ह्यांनी स्टार्ट-अपचे महत्व पटवून दिले आणि उपलब्ध असणाऱ्या जागतिक संधीची माहिती सादर केली तर २००३ ची एमसीएची विद्यार्थिनी रितू अब्बी ह्यांनी आयटी क्षेत्रात होणाऱ्या चढउतार बाबत माहिती दिली आणि त्यात विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जावे ह्याचे सखोल विश्लेषण सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि इस्टिट्यूटचे परिचय ट्रेनिंग एंड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा ह्यांनी केले तर विद्यार्थ्यांचे स्वागत करतांना अध्यक्षीय भाषणात संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे ह्यांनी उच्च पदावर स्थित असलेल्या आणि स्वबळावर यशस्वी व्यापार उभारणाऱ्याचे कौतुक केले आणि इस्टिट्यूटप्रती त्यांची मोलाची भूमिका आणि कर्तव्य ह्याची आठवण करून देत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले तसेच इस्टिट्यूटच्या स्थापनेपासून आजवरचा प्रगतीचा चढता आलेख सादर केला आणि भविष्याच्या विविध विद्यार्थीभिमुख योजनांसह आयएमआरच्या स्वायत्त होण्याबाबतची माहिती उपस्थितांना दिली.

ह्या सोहळ्यात इस्टिट्यूटच्या वतीने डॉ. तनुजा फेगडे, डॉ. ममता दहाड, प्रा. उदय चतुर, डॉ. पराग नारखेडे, मुरलीधर वायकोळे, डॉ. निशांत घुगे, प्रा. एस.एम.खान उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांना इस्टिट्यूटचे स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले.

 

 

Protected Content