Home राष्ट्रीय आयएएस टॉपरचा धक्कादायक निर्णय; नोकरी सोडून राजकारणात उतरणार !

आयएएस टॉपरचा धक्कादायक निर्णय; नोकरी सोडून राजकारणात उतरणार !

0
46


नवी दिल्ली वृत्तसंस्था । जम्मू-काश्मिरचे पहिले आयएएस टॉपर शाह फैसल यांनी नोकरीच्या राजीनाम्यानंतर राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

शाह फैसल यांनी २०१०च्या युपीएससी परिक्षेत देशातून पहिला क्रमांक पटकावला होता. आजवर आयएएस टॉपर ठरलेले ते एकमेव काश्मीरी आहेत. यामुळे त्यांना जम्मू-काश्मिरमध्ये आयकॉनचा दर्जा मिळाला. तथापि, त्यांनी आकस्मीकपणे नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी केंद्र सरकारवर काश्मिरबाबत दुजाभाव करण्याचा आरोप करून राजीनामा दिला आहे. दरम्यान, फैसल यांचा हा निर्णय राजकीय आकांक्षेपोटी घेण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ते आगामी लोकसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाकडून मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound