यावल (प्रतिनिधी) येथील डॉ.जाकीर हुसैन उर्दु हायस्कुलमध्ये नुकतीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आमदार शिरिषदादा चौधरी अभिनव स्पर्धा परीक्षा मोठ्या उत्साहात पार पडली.
यावल तालुक्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांना स्पर्धा परीक्षेची सवय व्हावी त्यांच्या प्रज्ञाशिलतेला चालना मिळावी, यासाठी आमदार शिरिषदादा चौधरी अभिनव स्पर्धा परीक्षा ही तालुक्यातील यावल, किनगाव, दहीगाव आणि फैजपूर या चार परीक्षा केंद्रावर शांततेत पार पडली. या परीक्षेत ७३० विद्यार्थ्यांनी सहभाग आपला नोंदविला. ही परीक्षा तीन गटात घेण्यात आली होती. पहिला गट 3 री ते 6 वीदुसरा गट 7 वी ते 10 वी,तिसरा गट 11 वी व त्या पुढील गटात घेण्यात आली.
तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पहिल्या गटात प्रथम टॅबलेट , द्वितीय सायकल, तृतीय स्टडी टेबल, द्वितीय गटात प्रथम टॅबलेट , द्वितीय सायकल, तृतीय स इंग्लिश स्पिकिंग किट, तृतीय गटात प्रथम ३oo०, द्वितीय २ooo, तृतीय बक्षीस १००० रुपये होते. तसेच प्रत्येक शाळेला उत्तेजनार्थ बक्षिसे दिले गेले. परीक्षेला केंद्रप्रमुख म्हणून भूषण नागरे, शिक्षीका नीता गजरे, नम्रता पाटील, भुपेंद्र राजपूत, अभय वाणी, इत्यादी होते. त्याच प्रमाणे या परीक्षेला पंचायत समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील, सतीश मोरे, मोरे कॉम्पुटर फैजपूर, निलेश पाटील मोरे कॉम्पुटर, रितेश पाटील इत्यादींनी अनमोल सहकार्य केले. ही परीक्षा धिरज पाटील यांनी आयोजित केली होती.