जळगाव प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या कठीण संकटात समाजासाठी रुग्णसेवेच्या माध्यमातून मानवसेवेचे अतुलनीय काम करून समाजापुढे मानवतेचा आदर्श निर्माण केलेल्या कार्याबद्दल चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे यांना फैजपूर कार्यालयाच्या वतीने कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
आमदार लताताई सोनवणे यांनी चोपडा मतदारसंघात कोरोना महामारीच्या कठीण काळात जीवाची पर्वा न करता निधीचा पाठपुरावा करून चोपडा उपजिल्हा रुग्णालयासाठी आयसीयू बेडचे लोकार्पण करून माझे कुटुंब माझी जबाबदारी यासारख्या विविध शासकीय योजना गावागावात जाऊन राबविण्यावर भर दिला. यामुळे मतदारसंघात कोरोनावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणेकामी शासकीय यंत्रणेसोबत खारीचा वाटा घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या फैजपूर उपविभागीय दंडाधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिलेले सन्मानपत्र आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या वतीने माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी स्वीकारले. याप्रसंगी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील, शिवसेनेचे यावल तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे उपस्थित होते.