आमदार भोळेंच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे प्रश्नचिन्ह

 

 

जळगाव : प्रतिनिधी । बी एच आर घोटाळ्यातील आरोपी सुरज झंवर यांच्याकडे सापडलेले आमदार राजूमामा भोळे यांचे लेटरपॅड बनावट असल्याचा खुलासा आमदारांनी केलेला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी त्यांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावले आहे .

बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्यात पुणे येथे विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात धाडसत्र राबवून संशयितांना अटक केली आहे. संशयित सुनील झंवर हा अद्याप पोलिसांना हाती लागलेला नाही. तपासात सुनील झंवरप्रमाणेच त्याचा मुलगा सूरज
झंवर याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जयनगरातील राहत्या घरुन २२ जानेवारी सूरजला अटक केली. यानंतर सूरज यास न्यायालयाने ११ दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर आता सूरज न्यायालयीन कोठडीत पुणे येथे कारागृहात
आहे.

यावेळी पोलीस तपासात जळगाव शहराचे आ. सुरेश भोळे (राजूमामा भोळे) यांचे लेटरहेडही त्यांना मिळन आले. यावेळी चौकशी केली असता भोळे यांनी ते बनावट असल्याचे सांगून कानावर हात ठेवले होते . होता. परंतु, आमदाराचे कोणीही लेटरहेड छापू शकतो का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्याचबरोबर भोळे यांचा यात सहभाग नाही, असे कसे होऊ शकते ? असा प्रश्न उपस्थित करीत अभिषेक पाटील यांनी योग्य तपास करण्यात येऊन पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे .

 

Protected Content