सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला भल्या पहाटे भीषण अपघात झाला असून यातून ते सुदैवाने बचावले आहेत.
या संदर्भातील माहिती अशी की, माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे आज पहाटे आपल्या गावी जात होते. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ पुलावरून गाडी जात होती. त्याचवेळी चालकाचं फॉर्च्युनरवरील नियंत्रण सुटल्याने त्यांचे वाहन खोल खड्ड्यात पडले. या फॉर्च्युनरमधून आमदार जयकुमार गोरे यांच्यासै चौघे प्रवास करत होते. यात गोरे यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर फलटण येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातून अनेकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मोठ्या नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली. या अपघातातील चौघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांच्यामार्फत देण्यात आली आहे.