आमदार चंद्रकांत पाटील धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला (व्हिडिओ)

मुक्ताईनगर-पंकज कपले | आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरून जात असतांना हरताळा फाट्याजवळ झालेल्या अपघातातील जखमीस स्वतःच्या वाहनात बसवून उपजिल्हा रुग्णालयात नेवून उपचार करून घेतले.

 

मतदार संघातील दैनंदिन कार्यक्रम आटपून मुक्ताईनगरकडे परतीच्या प्रवासात असलेले आ.चंद्रकात पाटील यांना राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरील हरताळा फाट्याजवळ ॲपे रिक्षा या तीन चाकी गाडीचा अपघात होऊन ते वाहन रस्त्याच्या कडेला पडलेले दिसून आले. तसेच वाहन चालक शेजारीच जखमी स्वरूपात पडल्याचे पाहून त्यांनी वाहून थांबवले आणि लागलीच जखमीची आस्तेवाईकपणे विचारपूस करत त्या जखमीला तात्काळ स्वतःच्या वाहनात बसवून मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालय गाठून जखमीवर तातडीने उपचार करून घेतले. रणरणत्या उन्हात जखमी कासावीस होऊन रस्त्याच्या कडेला मदतीच्या अपेक्षेने पाहत असताना अशा वेळी कोणीच वाहन थांबवीत नसल्याने आशा मावळलेल्या जखमींच्या मदतीसाठी चक्क आमदारच धावून आल्याने पुढील अनर्थ टळला असून सदरील जखमी व्यक्तीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे आमदारांनी स्वतः विचारले असता जखमी ने तो सालबर्डी ता. मुक्ताईनगर येथील असल्याचे व त्याचे नाव रामभाऊ भाकरे आहे असे सांगितले. आमदारांनी लागलीच सालबर्डी येथील त्याच्या कुटुंबीयांना कळविले.

दरम्यान , आमदार चंद्रकांत पाटील हे विद्यार्थी दशेपासून च अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात त्यांना वेळेवर उपचार मिळवुन देण्यासाठी अग्रेसर असायचेयामुळे अनेक अपघातग्रस्तांचे जीव वाचविण्यासाठी धडपले आहेत तसेच कोरोना संकट काळात तर त्यांची कामगिरी व सजगता यामुळे मतदार संघातील हजारो रुग्णांचे जीव वाचलेले असल्याने यामुळे ते केवळ आरोग्य दुत नव्हे , तर देवदूत ठरलेले आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/557617402418971

 

Protected Content