सोलापूर : वृत्तसंस्था । राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यावर फवसणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश बार्शी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिले आहेत.
शेतकरी श्रीहरी शिंदे यांच्या नावाने ३ लाख ९३ हजार रुपयांचे कर्ज परस्पर काढल्याचा आरोप रणजितसिंह शिंदे यांच्यावर आहे.
बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी शेतकरी श्रीहरी शिंदे यांच्या नावावर परस्पर कर्ज काढल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी श्रीहरी शिंदे यांच्या नावाने कागदपत्रे तयार करून बँक ऑफ इंडिया मध्ये खाते उघडले. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर श्रीहरी शिंदे यांच्या नावे ३ लाख ९३ हजार रूपयांचे कर्ज मंजूर झाले. त्यानतंर मंजूर झालेली रक्कम परस्पर रणजितसिंह शिंदे यांच्या नावावर वर्ग करण्यात आल्याचा आरोप रणजितसिंह यांच्यावर आहे. या कर्जाबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचा दावा श्रीहरी शिंदे यांनी केला आहे. रणजितसिंह शिंदे हे बबनराव साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
रणजितसिंह शिंदे यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम वर्ग झाल्याचीही कल्पना शेतकरी श्रीहरी शिंदे यांना नव्हती. मात्र, कर्जाची रक्कम व्याजासह परत करण्याची नोटीस श्रीहरी शिंदे यांना आल्यानंतर हा प्रकार समजल्याचा श्रीहरी यांचा दावा आहे. कर्जाची व्याजासह रक्कम ३ लाख ९३ हजार २०२ रुपये आहे.
. बार्शी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आमदार पुत्र रणजितसिंह शिंदे, बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज कारखान्याचे कार्यकारी संचालक, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी आणि अन्य एकाजणावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार बबनराव शिंदे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठऱणार आहे.