आबासो व. ता. पाटील यांच्या स्मृतीदिनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील शिक्षण महर्षि आबासो.  व.ता.पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा  एकूण ९९४ रुग्णांनी लाभ घेतला.

 

आबासो व.ता. पाटील यांच्या स्मृतीदिनी शनिवारी मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये  महा आरोग्य शिबिरांतर्गत गरजूंची मोफत तपासणी करुन औषधींचे वाटप करण्यात आले. तसेच  अनेक प्रकारच्या चाचण्या मोफत करुन देण्यात आल्या. या महा आरोग्य शिबिराचे  उद्घाटन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माध्यमिकचे शिक्षण संचालक महेश पालकर उपस्थित होते. प्रास्ताविक आबांच्या स्नुषा डॉ. ज्योती श्रीकांत पाटील यांनी केले.  आबासो.व.ता.पाटलांच्या समाजकार्याचा वसा आम्ही थेट चालवत राहू असे त्यांनी आठवणींना उजाळा देत सांगितले.   महा आरोग्य शिबीराच्या माध्यमातून रुग्णांच्या महागड्या चाचण्या करुन देणे, मोफत गोळ्या औषधी वाटणे हे या शिबीराचे फलित होय. हे कुटुंब व.ता.आबांचा कार्याला जीवंत ठेवत असल्याचे गौरवोद्  डॉ. धनराज माने यांनी काढले. महेश पालकर म्हणाले की, आम्ही बोलणारे तिघे पश्चिम महाराष्ट्राचे आहोत. चांगल्या उपक्रमांत सहभागी होणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. अतिथींचे स्वागत व.ता.आबांचा मुलगा कॉर्डियोलॉजिस्ट कन्सल्टंट डॉ. श्रीकांत,  दुसरा मुलगा दै.पुण्य प्रताप चे मुख्य संपादक विवेकानंद भाऊसाहेब व  ४ हायस्कुलचे चेअरमन सयाजीराव उर्फ बबलू दादा या भावंडांनी केले.

या शिबिरात मुंबईचे डॉ. दिपक सुदाम अहिरे तसेच डॉ प्रशांत लखीचंद पाटील, डॉ. दिनेश सी. महाजन,  डॉ. दिपक विजय धनगर, पंकज चौधरी, आणि डॉ. श्रीकांत वसंतराव पाटील व त्यांची पत्नी डॉ. ज्योतीपाटील यांनी  रुग्णांची तपासणी केली.  जयऋतुकमल हॉस्पिटल आणि आयसीयु नवी मुंबई  संचलित मोरया हॉस्पिटल अमळनेर, स्व. आबासो. व.ता.पाटील फाउंडेशन,  दै. पुण्य प्रताप परिवार, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, चुंचाळे, ता.चोपडा, तन्वी एज्यु. सोसायटी अँड करियर अकॅडमी ठाणे यांच्या संयुक्त  विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबीर  यशस्वीतेसाठी प्रा.प्रशांत पाटील, रविंद्र ठाकूर, चंद्रकांत पाटील, एस.आर.पाटील,  निवेदिता पाटील, मनिषा पाटील,  प्रा. शाहू पाटील आदिंनी सहाय्य केले.  सूत्रसंचलन प्रा. आनंदसिंग पाटील यांनी केले.

 

Protected Content