नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान का शांत आहेत?, ते का लपवत आहेत? काय घडले हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली?, असा असा सवाल राहुल गांधी मोदींना विचारला आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलेय की, पंतप्रधान मौन बाळगून का आहेत? ते लपून का बसत आहेत? झाले तेवढे बस्स झाले! काय झाले ते आम्हाला समजलेच पाहिजे. आपल्या जवानांना मारण्याची चीनची हिंमतच कशी झाली? आपली जमीन बळकावण्याची चीनचे धारिष्ट्य कसे झाले, अशा प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधी यांनी मोदींना उद्देशून केली आहे. गलवाण खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत भारताचे १७ जवान जखमी झाले होते. पण रात्रीच्या प्रचंड थंडीत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला तीन आणि नंतर १७ असे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत मरण पावले. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या लष्कारात झालेल्या संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान का शांत आहेत?, ते का लपवत आहेत? आता हे पुरे झाले आहे. लडाख येथे नेमके काय घडले आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. चीनने आपला भूभाग घेण्याची हिंमत कशी केली, असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.