आपत्ती निवारण मदतीचे निकष बदला ; मुख्यमंत्र्यांचे मोदींना पत्र

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोनामुळे नुकसान झालेल्यांना राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत करताय यावी, यासाठी  मुख्यमंत्र्यांनी  बुधवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले असून, आपत्ती निवारण निधीसंदर्भात मदतीचे निकष बदलण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

 

 

राज्यात दिवसेंदिवस  संसर्ग वाढत असल्याने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांसाठी संचारबंदीची घोषणा केली आहे. ही घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी आपण पंतप्रधान मोदींना काही मागण्यांसाठी पत्र लिहणार असल्याचे सांगितले होते.

 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलली गेली पाहिजे. पूर परिस्थिती, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्ती काळात नुकसान झालेल्यांना सरकारकडून भरपाई दिली जाते. कोरोना महामारीमुळे अनेकांना त्यांचे व्यवसाय बंद ठेवावे लागले आहेत. कित्येक जणांचा रोजगार देखील हिरवला गेला आहे. अशा नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमधील मदतीचे निकष बदलले जावेत.

Protected Content