पुणे (वृत्तसंस्था) आपके राज्य में हम आपकी बिना परमिशन के आ गए है, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी असे म्हटल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्मित हास्त करत ‘असे काही नाही’ म्हणून त्यांचे स्वागत केले. अगदी थोड्याच वेळासाठी झालेल्या अजित पवार आणि राज्यपालांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पुण्यात शासकीय ध्वजारोहण सोहळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थितीत होते. अजित पवार जेव्हा राज्यपालांचे स्वागत करण्यास पोहोचले होते, तेव्हा राज्यपालांनी आपल्या शैलीत चांगलीच कोपरखळी अजितदादांना लगावली. राज्यपाल कोश्यारी म्हणाले ‘तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या राज्यात आलो आहे’ अशी मिश्किल टिप्पणी राज्यपाल कोश्यारी यांनी केली. त्यावर अजित पवार यांनीही हसून ‘अरे ऐसा कुछ नही’ असे म्हणत राज्यपालांना प्रतिसाद दिला. दरम्यान, राज्यपालांच्या या कोपरखळीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.