चोपडा (प्रतिनिधी)| दहावी हा शिक्षणाचा पाया असून शिक्षण चांगले झाले तर विद्यार्थी कुठेही शिक्षण घेऊ शकतो, आधुनिक युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी केले.
अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी महिला नागरी सह पतसंस्था चोपडाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गोभी जिनिंगमध्ये ठेवण्यात आला होता, त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार जगदीश वळवी, डी. पी.साळुंखे, चोसाकाचे माजी चेअरमन ऍड. घनश्याम पाटील, माजी जि.प.अध्यक्ष छन्नू पाटील , नगराध्यक्षा मनिषा चौधरी, गोकुळ पाटील, जि.प.सदस्या नीलिमा पाटील, माजी प.स.सभापती भारती बोरसे, लक्ष्मी महिला नागरी सह पतसंस्था चेअरमन ऊर्मिलाबेन गुजराथी, कांचन राणे, रजनी गुजराथी, सीमा अग्रवाल, करमरकर आदी उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र, पारितोषिक, फुलगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी डॉ.रवी पाटील यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील पाटील यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रहास गुजराथी यांनी केले. कार्यक्रम यासस्वीतेसाठी शाम गुजराथी, राजेन्द्र पाटील आदिंनी केले.