रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा आदिवासी विकास विभाग कर्मचारी पतपेढीमध्ये परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवला असुन परिवर्तन पॅनलचे मनीष तडवी यांची चेअरमन पदी; व्हाईस चेअरमन पदी विनोद पाटील तर सचिव पदी अविनाश शिवरामे यांची बिनविरोध करण्यात आली आहे.
आदिवासी विकास विभाग कर्मचारी सोसायटीत पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागातील कर्मचारी बांधवांनी परिवर्तन पॅनलचे प्रमुख एम.बी. तडवी तसेच एच.डी पाटील व रवींद्र भादले यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलचे संभाजी पाटील,अविनाश शिवरामे, मनीष तडवी, विनोद पाटील,रचनाताई पाटील विलास भोई हे विजयी झाले.
येथे ३५ वर्षानंतर सत्तांतर झाले.परिवर्तन पॅनलच्या यशामध्ये भूपेंद्र पाटील , दस्तगीर तडवी ,विष्णू गुळवे,संजय अलोने, मोनिकाताई खरात, राजेंद्र बोदडे,महेंद्र पाटील,विजय कचवे, हिरालाल पवार ,उत्तमराव मनगटे ,भालचंद्र पवार , डी.आर.पाटील ,किरण पाटील, के.पी.ठाकरे, प्रशांत सैंदाणे, एस.एम. पवार, निलेश तडवी, विजयानंद सुरवाडे, सुहास देवराज, पाचपांडे सर, गवारे सर, रमेश तडवी, भिसे सर, फेगडे सर, युनूस तडवी,पी.डी.पाटील ,प्रमोद पाटील ,पंकज पाटील ,भूषण भदाणे,विवेक पाटील तसेच सर्व यावल ऑफिस, वसतिगृह ,शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या सर्व पदाधिकारी व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. चेअरमन, व्हॉईस चेअरमन पदाची निवडणूक निवडणूक अधिकारी प्र. कृ.विरकर यांच्या उपस्थितीत पार पडली.