कोळी समाजाच्या सर्व मागण्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : ना. पाटील (व्हिडीओ)

पाळधी, ता. धरणगाव । कोळी समाज बांधव त्यांच्या हक्कांसाठी करत असलेल्या लढ्यासाठी आपले पुर्ण समर्थन असून यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.  आमदार लताताई सोनवणे यांच्या नंदुरबार येथील जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालय धुळे येथे स्थलांतरित करण्यात यावे या मागणीसाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. आदिवासी कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पाळधी येथील मातोश्री हॉटेलपासून ते पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत पदयात्रा काढून निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते.

आदिवासी कोळी समाजाच्या या आहेत मागण्या

सुप्रिम कोर्टाने अवैध झालेल्या प्रकरणाची कारवाई व्हावी, दावा प्रकरणा समाज बांधवांना दावा सिध्द करण्याची संधी द्यावी तोपर्यंत सेवा खंडीत करू नये, अनुसुचित जमातीच्या जागेवर नोकरी करत असलेल्या समाज बांधवांना एसबीसी विशेष मागासवर्गाचे दावे स्विकारलेले आहे त्यांना दवा शाबीत करण्याची संधी द्यावी. १५ जून २०२० च्या परिपत्रकानुसार मंत्री छगन भुजबळ यांनी त्वरीत अहवाल अनुसुचित जमातीच्या बाजूने द्यावा व निवेदनाचा विचार करावा. अधिसंख्या पदावर नोकरी करणाऱ्या जमात बांधवांचे वेतन, वेतन वाढ, महागाई भत्ता व इतर भत्ते, सेवानिवृत्तीचे लाभ व ग्रॅज्यूटी अथवा पेन्शन बंद करू नये, राज्यातील टोकरे, महादेव, मल्हार, ढोर कोळी, मन्नेरवारलू, ठाकर, ठाकूर, हलबा, हलबी यांना इतर समाजाप्रमाणे प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे.

या सर्व मुद्यावर संघर्ष समितीच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चेसाठी वेळ द्यावी आणि कोळी समुदायांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवावा अशी विनंती या आदिवासी संघर्ष समितीने पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांना केली आहे.  याप्रसंगी ॲड. गणेश सोनवणे, सुरेश नन्नवरे, अनिल नन्नवरे, समाधान मोरे, मुक्ताईनगर येथील नितीन कांडेलकर यांच्यासह धुळे, नंदूरबार, नाशिक, शहादा येथील कोळी समाज बांधव उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2782192875341995/

 

Protected Content