जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांना विविध उपक्रमासाठी सभागृह व भवन बांधण्यासाठी शासनाकडून भूखंड उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी अखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीने गुरुवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना निवेदन देण्यात आले.
कोळी समाज बांधवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी जमातीचा सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास साधण्याचे अनुषंगाने सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येते. यात प्रशिक्षण शिबीर बारावीने चर्चासत्र आयोजन करणे, उद्योग व्यवसाय विषयक शिबिर भरवणे, आदिवासी वस्तूंची कलेची व अन्य उत्पादनाची प्रदर्शनी भरवणे तसेच सामाजिक मेळाव व सामूहिक लग्न सोहळा याचा समावेश होतो. हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी शासनाने आदिवासी कोळी समाजाला सभागृह व भवन निर्मितीसाठी कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर भूखंड मिळवून देण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रदेश सचिव अनिल नन्नवरे, जिल्हाध्यक्ष प्रवीण बाविस्कर, जिल्हा संघटक भरत सपकाळे, युवा अध्यक्ष धनराज साळुंखे, वकील संघाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रमाकांत सोनवणे, जिल्हा महिला अध्यक्ष एडवोकेट स्मिता झाल्टे, युवा उपाध्यक्ष सुखदेव रायसिंग, रवींद्र नन्नवरे, प्रमोद नन्नवरे, मोहन सपकाळे, अजय नन्नवरे, अक्षय मोरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.