आदिवासी आश्रमशाळेतील सफाई कर्मचाऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रम शाळेतील शिपाई कर्मचाऱ्याने राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

 

यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रमशाळेत  नामदेव दगडू खैरनार (वय-५६) रा. वड्री ता. यावल सफाई कामगार काम म्हणून कामाला होते.  नामदेव खैरनार यांनी सोमवारी ८ मे रोजी सकाळी गळफास घेवून  आत्महत्या केली.  आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. नामदेव खैरनार हे२०१६ पासून मागील ८ वर्षापासून डोंगरकठोरा आदिवासी आश्रम शाळेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. आज सकाळीच नामदेव खैरनार यांनी वड्री येथे राहणाऱ्या मोठ्या मुलाला फोन करून मला माझ्या लहान मुलाशी बोलायचे आहे, असे बोलुन लहान मुलाशी बोलणे झाले नाही. त्यावेळी त्यांनी मोठ्या मुलाशी माझी तब्येत खराब आहे  व मला भेटायला ये असे सांगितले. तसेच माझ्या खिशातील चिठ्ठी वाचुन घ्याची असे सांगीतल्याने तातडीने मुलाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान भेटण्यासाठी मोठा मुलगा आणि सून हे आले असता त्यांच्या येण्याची आधीच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

Protected Content