आदर्श शिक्षक स. ध. भावसार यांनी केला विद्यार्थ्यांचा गुणगौरव

 

पारोळा प्रतिनिधी । येथील महाजन भाऊ-बहिणीने शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविल्याने आदर्श निवृत्त शिक्षक स. ध. भावसार यांनी रोख रक्कम व प्रशिस्तीपत्र देऊन गौरव केला.

पारोळा येथील रहिवासी व सध्या जळगाव येथील नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयातील उपशिक्षक विनोद भिकन महाजन यांची सुकन्या मयुरी हिने दहावीच्या परीक्षेत ९८.८० टक्के गुण मिळवून ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला तर सुपुत्र भावेश याने माध्यमिक ( इयत्ता ८ वी ) शिष्यवृत्ती परीक्षेत ६८.०३ टक्के गुण मिळवून शहरी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान संपादन केले व शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला. महाजन भावंडांच्या या उत्तुंग यशाबद्दल राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी या विद्यार्थ्यांना पारोळा येथे आपल्या निवासस्थानी बोलावून रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. त्याचबरोबर त्यांना घडविणारे, शिक्षणासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करणा-या आई वडिलांचा देखील भावपूर्ण सत्कार केला. विनोद महाजन हे सरांचे माजी विद्यार्थी असून विद्यार्थ्यांच्या मुलांनी नेत्रदीपक यश मिळवल्याचा भावसार सरांना विशेष आनंद व अभिमान वाटतो. याबद्दल शहरात या विद्यार्थ्याचे कौतुक होत असून भावसार सरांना धन्यवाद दिले जात आहेत.

Protected Content