पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसमणी येथील शेतकरी भिकन पाटील यांनी कर्जबाजारी असल्याने आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांना आ. चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नाने १ लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शिरसमणी येथील शेतकरी भिकन पाटील यांनी कर्जबाजारी असल्याने आत्महत्या केली होती. भिकन हे कुटुंबातील कर्ताव्यक्ति असल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. सदर कुटुंबियांनी आमदार चिमणराव पाटील यांच्याशी संपर्क साधुन सर्व परिस्थिती सांगितली. आ. चिमणराव पाटील यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून भिकन पाटील यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य म्हणुन उभारीयोजने अंतर्गत १ लक्ष रूपये मंजुर करून आणले. १ लक्ष रुपयांचा धनादेश देतांना शेतकरी सहकारी संघाचे संचालक चेतन पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, माजी सरपंच सुदाम पाटील, गोकुळ पाटील, संदीप पाटील, चेअरमन किशोर पाटील, संतोष महाजन, तलाठी वाघमारे, कोतवाल एकनाथ पाटील, तसेच या अर्थसहाय्य मिळाल्याबद्दल कुटुंबियांनी आमदार चिमणराव पाटील, तहसिलदार, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य, तलाठी, ग्रामसेवकयांचे आभार मानले.