नवी दिल्लीः वृत्तसंस्था । सारथी पोर्टल सुरू झाल्यानंतर आता लर्निंग लायसन्स आणि वाहन चालक परवाना नूतनीकरणाचे काम ऑनलाईन करता येणार आहे.
बनावट ड्रायव्हिंग लायसन्सवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने परिवहन मंत्रालयाने 31 मार्चरोजी राष्ट्रीय नोंदणीला सुरुवात केलीय. नॅशनल रजिस्टरवर ड्रायव्हिंग लायसन्समधील कोणताही बदल ऑनलाईन केला जाणार आहे, त्यामुळे बनावट लायसन्सना आळा घालता येणार आहे.
धोकादायक चालकांची ची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. अशा वाहनचालकांची नावे जाहीर केली जातील.
देशात दरवर्षी सुमारे दीड लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. अशा हजारो घटना घडत असतात, ज्यात ड्रायव्हरच्या चुकांमुळे अपघात होतो. सध्या ड्रायव्हिंग लायसन्सविषयी संपूर्ण माहिती राष्ट्रीय माहिती केंद्राच्या सारथी पोर्टलवर उपलब्ध आहे. आता नॅशनल रजिस्टर सुरू झाल्यानंतर पुढच्या काही महिन्यांत सारथीवर उपलब्ध जुना डेटा त्यावर स्थलांतरित होणार आहे. या व्यतिरिक्त परिवहन मंत्रालयाने ज्या वाहनचालकांचा परवाना रद्द केला आहे किंवा त्यांनी मोठी चूक केली आहे, त्यांच्या यादीची माहिती देण्याचा निर्णय घेतलाय.
परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स आणि विविध राज्यांच्या नोंदणी प्रमाणपत्रांची संपूर्ण माहिती एकत्रितपणे राष्ट्रीय रजिस्टर तयार केले. याच्या मदतीने कोणत्याही वापरकर्त्यास त्याच्या कामाची माहिती कोणत्याही वेळी मिळू शकते. ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापासून ड्रायव्हिंग लायसन्स प्रिंट करण्याचे काम आता शिकता येणार आहे. याशिवाय परवाना कालबाह्य झाल्यावर वर्षभरात त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते.