आता देशभर ‘कॅच द रेन’ जलसंधारण मोहीम

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ भाषण दरम्यान जलसंधारणाचे महत्त्व यावर जोर दिला. जल शक्ती मंत्रालय लवकरच ‘कॅच द रेन’ नावाची जलसंधारण मोहीम राबवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

 

“जलसंधारणाबाबतची आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी. काही दिवसात जलशक्ती मंत्रालय ‘कॅच द रेन’ ही मोहीम राबवेल. त्याचा नारा म्हणजे ‘कधीही आणि कुठेही पाऊस पडो, कॅच द रेन’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

 

प्रत्येक संस्कृतीत असलेले पाण्याचे आणि जलसंचयांचे महत्त्व सांगून मोदींनी आपल्या रेडिओ कार्यक्रमाला सुरुवात केली. ते म्हणाले, “माघ महिन्यात पवित्र जलाशयात स्नान करणे शुभ मानले जाते. प्रत्येक संस्कृतीत नद्यांशी संबंधित काही ना काही परंपरा आहेत. बऱ्याच संस्कृती नदीच्या काठावर विकसित झाल्या आहेत.”

 

 

या महिन्याच्या सुरूवातीलाच पंतप्रधानांनी देशातील लोकांना कला, संस्कृती आणि पर्यटन क्षेत्रातील प्रेरणादायी कथा सुचविण्यासाठी सांगितले होते.

 

जानेवारीच्या ‘मन की बात’मध्ये प्रेरणादायक उदाहरणांच्या माध्यमातून कला, संस्कृती, पर्यटन आणि शेतीविषयक विविध नाविन्यपूर्ण विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला होता. कार्यक्रमाच्या मागील भागात मोदींनी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय राजधानीत शेतकरी आणि दिल्ली पोलिस यांच्यात झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला होता.

 

“यावेळी कुंभ हरिद्वारमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पाणी हे आपल्यासाठी जीवन आहे, हा विश्वास आहे आणि हा विकासाचा प्रवाह आहे. एक प्रकारे पाणी परिसापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. असे म्हणतात की परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे रुपांतर सोन्यात झाले. तसेच, जीवनासाठी पाण्याचा स्पर्श आवश्यक आहे, विकासासाठीही ते आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

 

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पीएम मोदी यांनी स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी विज्ञानाचे महत्त्वही सांगितले. त्यांनी हा दिवस आदरणीय वैज्ञानिक डॉ. सी.व्ही. रामन यांच्या कार्याला आणि त्यांचा ‘रामन इफेक्ट’ शोधासाठी समर्पित केला. ते म्हणाले, “आपल्या तरूणांनी भारतीय शास्त्रज्ञांबद्दल बरेच काही वाचले पाहिजे आणि भारतीय विज्ञानाचा इतिहास समजला पाहिजे.”

 

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर पंतप्रधान म्हणून झालेल्या सर्वात मोठा खंत याबद्दल श्रोतांच्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जगातील सर्वात प्राचीन भाषा” तमिळ शिकू शकलो नाही म्हणून मला बऱ्यावेळा वाईट वाटते. “ही एक सुंदर भाषा आहे जी जगभरात प्रख्यात आहे. बर्‍याच लोकांनी मला तामिळ भाषेत लिहिलेल्या साहित्याची आणि काव्याची गुणवत्ता सांगितली. ”

Protected Content