आता चंद्रकांतदादा हिमालयात जाणार का ? : खडसेंचा सवाल (व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । विधानपरिषदेत आलेले अपयश हे भाजपच्या नेत्यांच्या अहंपणामुळे आलेले आहे….चंद्रकांत पाटील व फडणविसांचे भाजपचे पारंपरीक समजले जाणार्‍या मतदारसंघातील भाजपचा पराभव नक्कीच धक्कादायक आहे. चंद्रकांत पाटील यांनी पराभव झाला तर आपण हिमालयात निघून जाणार असल्याचे सूचित केले होते. यामुळे आता ते हिमालयात जाणार का ? असा प्रश्‍न एकनाथराव खडसे यांनी विचारला आहे.

आज पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार यश लाभले आहे. या पार्श्‍वभूमिवर, राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, पुणे आणि नागपूर मतदारसंघातून गत ५० वर्षांपासून भाजपचे उमेदवार निवडून येत होते. येथे भाजपचा झालेला पराभव धक्कादायक आहे. हा पराभव अहंपणामुळे झालेला आहे. फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील पराभव हा अतिशय धक्कादायक असल्याचे खडसे म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीने एक वर्षभरात केलेल्या कामाची ही पावती असल्याचे खडसे यांनी नमूद केले. ते म्हणाले की, सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारल्याची बाब लक्षणीय आहे. अर्थात, आगामी राजकारणाची ही नांदी असल्याचे म्हणता येणार नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.

तर, बीएचआर प्रकरणात सुरू असलेल्या पोलीस तपासात कुणाचे नाव आहे समोर येईलच असे खडसे म्हणाले. सुनील झंवर याच्याकडे गिरीश महाजन यांचे लेटरहेड सापडणे म्हणजे ते या घोटाळ्यात आहे असे होत नाही अशी पुस्ती देखील त्यांनी जोडली.

खालील व्हिडीओत पहा एकनाथराव खडसे नेमके काय म्हणालेत ते !

https://www.facebook.com/508992935887325/videos/817616522154272/

Protected Content