जळगाव (प्रतिनिधी) येथील सालार नगरमधील कोरोना पॉझेटिव्ह वृद्ध व्यक्तीचे गुरुवारी दुपारी निधन झाले. यानंतर सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख यांनी मुस्लीम बांधवांनी आता तरी बोध घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे भावनिक आवाहन केले आहे.
सालार नगरमधील कोरोना पॉझेटिव्ह वृद्ध व्यक्तीचे गुरुवारी दुपारी निधन झाल्यानंतर त्यांचा दफनविधी शहरातील मुस्लिम कब्रस्तानमध्ये इस्लामी रितीरिवाजानुसार करण्यात आला. यावेळी मुस्लिम ईद गाहचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख, माजी अध्यक्ष करीम सालार, सचिव अनिस शाह, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जीया बागवान, कुल जमातीचे सचिव डॉक्टर जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते इसहाक बागवान यांची तसेच मृत वृद्धाची तिघेही मुलांची उपस्थिती होती.
हाफिस रेहान यांनी जनाजा नमाज अदा केली. तर सात फूट बाय सात फूट असा खोल खड्डा करून दफनविधी करण्यात आला. दफनविधीसाठी इसाक बागवान शब्बीर पटेल अनिस शाह यांनी सहकार्य केले. दफन विधी व जनाजाची नमाज ही संपूर्णपणे योग्य ती शास्त्रीय दृष्टिकोनातील उपाय योजना नुसार करण्यात आली. संपूर्ण शरीराला प्लास्टिकचे कापड तोंडाला मास डोक्याला टोपी व पायाला मोजे संपूर्णपणे उपाययोजना केल्यानंतरच मोजक्या सहा-सात लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दफनविधी पार पडला.
आतातरी जागे व्हा..
जळगाव शहरातील मुस्लिम बांधवांना जळगाव मुस्लिम ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी नम्रतापूर्वक आव्हान केले आहे की, जिल्हाधिकारी जळगाव डॉक्टर अविनाश अविनाश ढाकणे यांनी केलेल्या आवाहनानुसार आपण आपापल्या घरात थांबा, कोणीही घराच्या बाहेर येऊ नका. ज्या कुणाला अत्यंत तातडीची गरज असेल अथवा मदत असेल, त्यांनी आम्हास आमच्या मोबाईल क्रमांक 94 231 85 786 अथवा 88 88025786 वर संपर्क साधावा व प्रशासनाला सहकार्य करावे.
जिल्हा प्रशासनाचे आभार
सदर मृत व्यक्तिसाठी शासनाकड़े म्हणजे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे, उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे,डीन डॉ.भास्कर खैरे, आरएमओ डॉ. किरण पाटील,पो.नि.रणजीत शिरसाठ,अकबर पटेल,ससे यांनी त्वरित सहकार्य केल्याबद्दल फारूक शेख यांनी त्यांचे आभार मानले आहेत.