आठवीच्या पुस्तकात भगतसिंह, राजगुरुंसह कुरबान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख !

 

पुणे (वृत्तसंस्था) राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरु यांच्यासह फासावर गेलेल्या सुखदेव यांच्याऐवजी कुरबान हुसेन अशा नावाचा उल्लेख केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

 

भगतसिंग, राजगुरु यांच्यासह फासावर गेलेल्या तिसऱ्या क्रांतिकारकाच्या नावात करण्यात आलेली ही चूक अक्षम्य असल्याचे ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी म्हटले आहे. ब्राह्मण महासंघाने हा मुद्दा उपस्थित केला असून हा सुखदेव यांचाच नव्हे तर समस्त क्रांतिकारकांचाच अपमान असल्याचा संताप व्यक्त केला आहे. ही सर्व पुस्तके मागे घेऊन संबंधित लोकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू या तिघांची नावे देशभरातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आहेत. मात्र प्रख्यात लेखक यदुनाथ थत्ते यांच्या “भारत माझा देश आहे” या पाठात या नावांमध्ये घोळ झाल्याची चूक निदर्शनास आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

 

काय आहे उल्लेख?

“देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र, दोघांवर प्रेम हवे, होय ना?”
“बरोबर आहे” मुले म्हणाली.
एक मुलगा म्हणाला, “भगतसिंह, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते”
मी विचारले “ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी…

Protected Content