जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सार्वजनिक गणेशोत्सवाचे विसर्जनाची मिरवणूक असल्याने चोपडा येथील आठवडे बाजार इतर सोयीच्या दिवशी भरविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवार २ सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रसिध्दीपत्रकान्वये दिले आहे. दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे की, सार्वजनिक गणेश उत्सवाचे विसर्जनाची मिरवणूक रविवारी ४ सप्टेंबर रोजी असल्याने चोपडा शहरातील आठवाडे बाजारातून गणरायाची मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे रविवारी ४ सप्टेंबर रोजी चोपडा शहरात भरणारा आठवडे बाजार हा इतर सोयीच्या दिवशी भरविण्यात यावे अश्या सुचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्ना निर्माण होणार नाही यासाठी नागरीक व गणेश मंडळांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे देखील आवाहन प्रसिध्दीपत्रकातून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
आठवडे बाजार इतर सोयीच्या दिवशी भरविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
2 years ago
No Comments