जळगाव प्रतिनिधी । जिह्यामध्ये चोवीस तासांमत कोरोना बाधित १ रुग्ण आढळून आला असून २ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात जिल्ह्यातून १ बाधित रूग्ण आढळून आला आहे. यात भुसावळात १ बाधित रूग्ण आढळून आला आहे. आता जिल्ह्यात १७ अॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर दोघे रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४२ हजार ८२७ रुग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.