जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आजारपणाला कंटाळून धनाजी काळे नगरातील यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
समाधान रामदास सुरवाडे (वय-४५) रा. धनाजी काळे नगर जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील धनाजी काळे नगरात समाधान सुरवाडे हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. परंतु गेल्या दिवसांपासून ते आजारी असल्याने ते नैराश्यात देखील होते. त्यातूनच सोमवारी दुपारी घरी कोणीच नसतांना सुरवाडे यांनी घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचा मुलगा घरी आला असता त्याला वडीलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. वडीलांना गळफास घेतल्याचा अवस्थेत बघताच त्यांने एकच आक्रोश केला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पंचनामा करुन मृतदेह खाली उतरवित शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.